.
Home » » मारिया शारापोवाची आगेकूच

मारिया शारापोवाची आगेकूच

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 09:14

टोकियो - रशियाच्या मारिया शारापोवा हिने थायलंडच्या तामारिन तानासुगरन हिचा सरळ सेटमध्ये 6-2, 7-5 असा पराभव करून येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफिक खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेसाठी दुसरे मानांकन मिळालेल्या शारापोवाने जोरकस फोरहॅंड फटक्‍याच्या जोरावर पहिला सेट अवघ्या तीस मिनिटांत जिंकला. नंतर दुसऱ्या सेटमध्येही तिने 3-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्या वेळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर तानासुगरन हिने चौथ्या गेमला शारापोवाची सर्व्हिस भेदून पहिली गेम जिंकली. त्यानंतर सलग पाच गेम जिंकताना तिने 5-5 अशी बरोबरी राखली. सहाव्या गेमला तानासुगरन हिची सर्व्हिस भेदून तिने पुन्हा आघाडी घेतली आणि नंतर अचूक सर्व्हिसच्या जोरावर तिने बाराव्या गेमला विजय मिळविला. ही लढत 1 तास 31 मिनिटे चालली.
दुसऱ्या फेरीच्या अन्य लढतीत फ्रान्सच्या सातव्या मानांकित मारियन बार्तोली हिने जपानच्या आयुमी मोरिटा हिचा कडवा प्रतिकार 6-3, 0-6, 6-3 असा मोडून काढला. बेसलाईनवरून खेळ करताना बार्तोलीला गुणासाठी झगडावे लागले. दुसऱ्या सेटमध्ये, तर तिला एकही गेम जिंकता आला नाही. बार्तोलीने अखेरीस 2 तास 18 मिनिटांच्या लढतीनंतर विजय मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतरही मोरिटा हिने तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये टाळता येणाऱ्या अनेक चुका करून पराभव ओढवून घेतला.
पात्रता फेरीतून आलेल्या लुक्‍झेम्बर्गच्या मॅंडी मिनेला हिने जपानच्या किमिको डाटे-क्रुम हिचे आव्हान 1-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. सर्बियाच्या ऍना इवानोविच हिने पात्रता फेरीतून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍनास्तासिया रॉडिनोव्हा हिचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. S TARUN BHARAT - All Rights Reserved
Template Modify by Creating Website
Proudly powered by Blogger